जाऊन धावड लोकांना मोलमजूरी करून पोटाचीआग शमविण्याची पाळी येऊन पोहोचली आहे.
येथील जमिनीचा हा भगवा रंग सातारचे बाजूकडे ६१२ मैलपर्यंत, व पुण्याचे बाजूकडे १३ १२ मैलपर्यंत व महाडाचे बाजूकडे थेट कोंकणपट्टीपर्यंत पसरलेला आहे. हा रंग चालणाराच्या जोडयास किंवा गाडीच्या चाकांस लागल्यावांचून राहत नाहीं, यामुळे देशावर राहणा-यांस गाडी किंवा प्रवाशी कोठून आले आहेत तें भगव्या रंगावरून सहज ओळखतां येतें. हा भगवा रंग अंगांस किंवा पांघरूणास लागला असतां लागलींच आपल्यासारखे करून टाकण्याची याच्यामध्यें विलक्षण कर्तबगारी आहे. यावरून या तांबडे मातीच्या आंगीं बरीच स्निग्धता असावी, असें उघड दिसतें. याचा दाखला मातींत काम करणा-या धावडांच्या ध्यानाकडे पाहिलें असतां चांगला येतो. या मातींचा असा पडलेला डाग साधारण धुण्याला दाद देत नाहीं. बारसोप किंवा शिककई यांचाच प्रयोग त्यावर करणें भाग पडतें. यामुळें येथें बारसोपचा बराच खप होतो. दुसरें असें आहे की, येथील परीट