पान:महाबळेश्वर.djvu/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५१ )

 लोक कोरें चिरगुट धुण्यास दिलें असतां तें धुवून काढण्यानें अगदीं रडकुंडी येतात. कारण कोरीं चिरगुटें पांघरुणें उन्हांत ओपत पसरून त्यावर बरेंच वेळ पाणी शिंपडावें लागतें. परंतु असें करण्यानें खालून तांबडे मातीचे डाग पडण्याचे बरेंच भय असतें.

---------------
हवा.
---------------

 महाबळेश्वराची खुबी अशी आहे कीं, येथें कितीही श्रम केले तरी फार शीण येत नाहीं व थोडाबहुत आला तरी तो थोडा वेळ टिकतो. याचें कारण येथील थंड हवा हें होय. समुद्राच्या पृष्ठ भागापासून महाबळेश्वराची उंची सुमारें ५००० फूट आहे. आणि म्हणून डोंगराच्या माथ्यावर वारा मोठ्या सोसाट्यानें चालतो, या तत्वास अनुसरून मैदानांतील प्रदेशांप्रमाणें येथें उष्णता भासत नाहीं. याचा अनुभव पुष्कळांस असेल. तसेंच पांडवगड, कमलगड, रायगड, मकरंदगड, सिंहगड, पुरंदर, तोरणा, प्रतापगड, पन्हाळा, यवतेश्वर, जरंडा, माथेरान वगैरे लहानसान डोंगरांवरही बराच गारवा असतो , हे पुष्क-