पान:महाबळेश्वर.djvu/84

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४९ )



हें तांबडे मातीचें लुकण कमी कमी होत गेलें आहे. या जमीनीतील तांबडे दगडाच्या थरांत कित्येक वेळीं पांढरे किंवा पिंवळे पैलूदार लहान लहान खड्यांचा थर लागतो. येथील मातींत जें अशोधित लोखंड आहे तें येथील मूळ राहणारे धावडलोक, यांत्रिक साधनाची मदत नसतां, ओबड धोबड साधनाने व अल्प मेहनतीने काढून, त्याचे ओबड धोबड जिन्नस तयार करीत आणि त्यावर आपलें पोट भरीत असत. तथापि लोखंड शोधून निघाल्यावर त्याची कमाई त्यांचे हातून चांगली होत नसल्यामुळे तवे, कढया यापेक्षां विषेश खुबीदार माल त्यांजकडून होण्याची व लोखंडी कारखान्यानें त्यांची चलती होण्याची आशाच नव्हती. असें पुरतेपणीं जाणून पुष्कळ धनाढ्य लोकांनीं मनांतल्या मनोराज्यांत कारखाने काढण्याच्या अनेक खटपटी केल्या. परंतु त्या तशाच स्वप्नाप्रमाणें झोंपेतल्या झोंपेतच राहिल्या. हल्ली जंगलांतील लांकूड व कोळसा यांची जंगलखात्याच्या विषेश सक्तीच्या नियमांमुळे टंचाई झाल्यानें हा लोखंड काढण्याचा कारखाना अगदीं बुडून