दिलें आहे. मालकमसाहेबांच्या दोन मुलीवरून “केट पाइंट" व अमेलियाखोरा हीं नांवें देण्यांत आलीं आहेत. राणीचा मुलगा ड्यूक आफ क्याॅॅनाटचे नांव कोनॉट् पीकला दिलें आहे. अलिकडे “ फ्रियर हॉल " व फ्रियरघांट हीं नांवें पडलीं आहेत; ' व रडतोंडीचा घाट' या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘रोटंडाघांट' असें नांव देण्यांत आलें आहे.
लहान लहान प्रतीचे साहेब लोक बंगल्याला आपली स्वतःची नांवें किंवा विलायतेंतील खुबीदार नांवे देतात, जसे “ ईगल्सनेस्ट् " “ वुडलॉंन " “हिलस्टोन” “ ग्लेनमेार ” “आलबॉनिया' “फोरओक्स' “ लिलीकाटेज ” “रोजकाटेज् " " सनिसाइडू ” "पारेडाइजलाज् " सिडनी हैीस वगैरे, असाच प्रकार सर्व ठिकाणच्या हवाशीर जागीं चालला आहे. तेव्हां जेथें मनुष्य यत्न व्यर्थ आहे अशा कांहीं सृष्ट वस्तूंखेरीजकरून बाकीच्या बाबतीत कोंडयाचा मांडा करून परदेश कंठणारें आमचें इंग्रजसरकार व त्यांची अनुयायी मंडळी यांची धन्य असो. यांच्या या अशा अप्रतिम गुणामुळे त्यांचें राज्यावर सूर्य कधीही