पान:महाबळेश्वर.djvu/80

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४५ )



याला इंग्रज लोकांनीं अगदीं आपल्या विलायतचे स्वरूप दिलें आहे. तसें देण्यास येथें विलायतेप्रमाणे थंड हवा, धुकें, पाऊस वगैरे जसे असावें तसें आहे.  येथील वस्तीचें नांव मालकमपेंठ ठेविलें आहे. या वस्तीला तीन पेठा आहेत त्यांस त्या ज्यांनीं बसविल्या त्यांचींच नांवें दिली आहेत. मध्यभागीं जी पेठ आहे तिला मालकमपेठ, उत्तरेकडील मशीद रस्ता व दक्षिणेकडे आहे तिला मरी पेंठ अशा संज्ञा आहेत. व प्रत्येक बंगल्याचें नांवही इंग्रजी असून सभोंतालचीं जीं रमणीय ठिकाणें आहेत त्यांची जुनीं नांवें टाकून देऊन त्या ऐवजीं साहेब लोकांनीं आपलीं नांवें दिलों आहत. एलफिनस्टन पाइंटास आपलें नांव दिलें आहे. त्यास पूर्वीचे नांव ब्रह्मारण्य असें होते. सिडनी पाइंटचें जुनें नांव 'डोमेश्वर' असें होतें तें सोडून देऊन सिडनी पाइंट असें नांव ठेविलें. आर्थरसीटचेंही मूळचें “ मडीमहाल ” असें नांव आहे. मुंबईंचे गव्हरनरावरून कार्न्याक पाइंट व फाकलंड पाइंट ही नांवे पडली आहेत. तसेच मुंबईचे हल्लीचे गव्हरनर लॉर्ड नॉर्थकोट यांचे नांव एक टोंकास