पान:महाबळेश्वर.djvu/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४४ )साताऱ्यापासून महाबळेश्वरपर्यंत जुना रस्ता होता तो मालकमसाहेबांनीं महाराजांकडून रडतोंडीचे घाटानें महाबळेश्वर घाटमाथ्याखालीं पारं घाटापावेतों वाढवून चांगला बांधून घेतला. तसेंच नहरास पाण्याचा तोटा होता म्हणून वेण्यातलावही करून घेतला.

  पुढे सन १८२९ सालीं ता० १६ मे रोजीं नामदार ईस्ट इंडिया कंपनी व सातारकर महाराज यांच्यामध्यें तहनामा होऊन मालकमपेंठ व सभोंवतील १५ मैलाच्या परिघाची जागा महाराजानीं कंपनीस दिली. तसेच पारगांवही दिलें, परंतु प्रतापगडचा किल्ला व त्या सभोंवतील गडक-याच्या जमिनी पूर्वीप्रमाणें महाराजांकडे रहाव्या असा स्पष्ट ठराव होता. मालकंपेठचे व पारगांवचें ऐवजी कंपनीनें महाराजांस खांबटकीचें घाटाखाली वांईहून सात कोस खंडाळे ह्मणून गांव आहे ते दिला. खंडाळें हें गांव पूर्वी र्शिद्याकडे होते, ते त्यांनीं इंग्लिशास दिलें होतें. पुढे १८४८ मध्यें सातारचें संस्थान खालसा झाल्यावर हें ठिकाण कुलाबा जिल्ह्यांतून काढून सातार जिल्ह्यांत सामील केलें. अशी येथें जागा घेऊन