Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४३ )



महाराजांकडून साताऱ्याहून येथपावेतों एक छानदार गाडीरस्ता करून घेतला. नंतर मुंबईचे गव्हर्नर सर जान मालकमसाहेबही येथें हवा खाण्याकरितां आले, आणि त्यांनीं आजारी युरोपियन शिपायांकरितां एक इस्पितळ बांधविलें. पुढें याच सालीं याच साहेबाचे अनुकरण करणारे दुसरे पुष्कळ साहेब लोक हवा घेण्याकरितां येथें येऊन भरले. पुढें कर्नल रॉबर्टसन साहेब सातारचे रेसिडेंंटचे जागीं आल्यावर त्यांनीं येथें एक बंगला बांधून टाकला. पुन्हां सन १८२८ चे नोवेंबर महिन्यांत मालकमसाहेब आपले बरोबर एक वुल्यमसाहेब ह्मणून कोणी डाक्टर घेऊन आले आणि त्यांनी त्याजकडून महाबळेश्वरच्या हवेची चिकित्सा करविली. नंतर त्यांनीं सरकारी बंगल्याकरितां जागा निवडून काढल्या व खाजगतचा आपला बंगला तयार करविला. तो अद्यापि कायम असून त्यास ‘माउंट मालकम ” असें ह्यणतात. मालकम साहेबाच्या सांगण्यावरून सातारचे महाराजांनीं नहर येथें एकगांव बसविला व त्यांस मालकमपेंठ हें नांव दिलें, परंतु हल्लीं हें महाबळेश्वर यानांवानें प्रसिद्ध आहे. पुढें