पान:महाबळेश्वर.djvu/68

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३५ )चा रंग अगदी जांभळा दिसतो तो झाडांच्या गालीच्यास फार शोभाप्रद होतो. या टेकडयांचीं शिखरें एका उंचीची व इतकीं जवळ जवळ दिसतात कीं एका टेकडीवरून दुसरीवर, दुसरीवरून तिसरीवर जाणेस दोन तीन ढांगेचें काम आहे असा भास होतो! आपले समोर पूर्वेकडे पाहिलें म्हणजे एखाद्या बागेतील सुरूचा ताटवा छाटून सारखा केल्याप्रमाणें सर्व झाडी कोणी करून ठेविली आहे कीं काय असें दिसतें. लहान झाडे व मोठे वृक्ष यांतील भेद तर मुळींच नजरेत येत नाहीं. असा हिरवागार गालिच्या जमिनीवरून चढत चढतां आकाशापर्यंत जाऊन अधांतरी कसा राहिला आहे हें समजण्याचें मोठं गूढ पडतें. झाडांचीं निरनिराळ्या प्रकारचीं पानें वरून एक सारखीं दिसतात. तेव्हां त्या कारागिराची असा चित्र विचित्र आकृतीचा गालिच्या काढण्यांत किती कुशलता असेल, असें वाटून मन अगदी थक्क होऊन जातें; पुढें पुढे गेलेवर मागे पाहिलें आणि पुढें पाहिलें तर नुसती दाट झाडी दिसते, यांतून पुढें जाण्यास वाट तरी असेल किंवा नाहीं याचीही शंकाच येते. मधून