पान:महाबळेश्वर.djvu/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३६ )मधून ठिकठिकाणीं पांढरे ठिपके दिसतात त्याठिकाणी आकाश खालीं उतरलें आहे कीं काय असा भास होतो. परंतु हे पांढरे ठिपके म्हणजे येथील पत्र्याचीं घरें आहेत. एकंदरींत महाबळेश्वरास पाहिजे त्या ऋतूंत जा, तें स्थान आपलें सदा रमणीय आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीँ. पण छत्र्यांवर पावसाळा काढणा-या घांठावरील लोकांनीं पावसाळयांत येथें येण्याचें धाडस करूं नये. महाबळेश्वरीं पाहण्यासारखी सारी मौज जो कोणी आक्टोबरच्या प्रारंभापासून जूनच्या मध्यापर्यंत आठ साडे आठ महिने येथें येऊन राहील त्याला दिसेल.

विशेषतः आक्टोबर महिन्यांत सह्याद्रीचा हा बाहू फारच रमणीय दिसतो. या महिन्यांत या पर्वतावरील सारी सपाट जागा हिरव्यागार गवतानें किंवा नानाप्रकारच्या रान फुलांनी आच्छादून गेलेली असते. जिकडें पहावें तिकडें गुलाबांचे झुबके सर्व कुंपणावरून भरून गेलेले दिसतात. प्रत्येक कड्यावरून शुभ्र ऐरावताच्या शुडादंडासारखे स्वच्छोदकाचे प्रवाह खालच्या दऱ्यांंत धडाधड उड्या