पान:महाबळेश्वर.djvu/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





देखावे.
---------------

 महाबळेश्वर क्षेत्र सोडून महाबळेश्वर किंवा मालकमपेठेकडे येऊ. नहर ऊर्फ हवाखाण्याचें महाबळेश्वर हें क्षेत्रापासून सुमारे ३ मैलावर आहे व हल्ली हें हवापाण्यासंबंधीने फार प्रसिद्धीस आलें आहे, असें पूर्वी सांगितलेंच आहे. क्षेत्राच्या बाहेर पडतांच जिकडे पहावें तिकडें डोंगर व झाडे यांशिवाय कांहींच दिसत नाहीं. उजवे हातास कोंकण प्रांतांतील अनेक डोंगरांच्या रांगा नाटकगृहांतील प्रेक्षकांकरितां केलेल्या जागाप्रमाणें दिसूं लागतात. पहिल्यानें खुर्च्यांच्या रांगाप्रमाणें लहान लहान डोंगरांच्या रांगा झाल्यावर पलीकडे प्रतापगड व सॅॅडल बॅक हिलचे डोंगर हे नाटकगृहांतील ग्यालरी सीटप्रमाणणें ऊंच दिसतात. सावित्री नदीचें पाणी प्रतापगडाचें पायथ्याजवळून वाहत चाललेलें दिसतें, त्याचीं वळणें रुप्यासारखी स्वच्छ पांढरी दिसून जणू कांहीं रुपेरी सापच पसरला आहे कीं काय असें वाटतें. उन्हाचेवेळी टेकड्यां