पान:महाबळेश्वर.djvu/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३२ )



आणि त्याचा मालमसाला प्रतापगडच्या किल्ल्यावर नेऊन तटाचे कामी लावला. पुढें मोरे याचा स्वतःचाही युक्तीने निकाल लावल्यावर दुसरा माणिकचौकाचा वाडा जोर गांवांत असलेला पाडून नाहींसा केला. त्याच्या भिंतीच्या खुणा अद्यपि येथें आहेत. पुढें महाबळेश्वर येथील ब्राह्मण लोकांस देवीचा कांहीं दृष्टांत होऊन गूण आल्यावर त्यांनी या ठिकाणी हें तिचें देऊळ बांधिलें आणि तेव्हांपासून ही देवी येथील सर्व महाबळेश्वरकरांचें कुलदैवत होऊन राहिली आहे. याशिवाय या क्षेत्री तीर्थे व कुंडेही बरीच आहेत.

 या क्षेत्राचे ठिकाणींं नेहमी कोणीना कोणीतरी कृष्णास्नान किंवा वंदन करण्यास येतच असतात. त्यामुळे त् यांचेकडून तेथील भिक्षुक ब्राह्मण लोकांस फायदा होतो. अलीकडे या क्षेत्रापासून सुमारें ३ मैलांवर नहर ऊर्फ मालकमपेठ हे हवा खाण्याचे ठिकाण पहिले प्रतीचें झाल्यामुळे तर चोहीकडून तेथें हवेकरितां येणारे पुष्कळ श्रीमंत हिंदुलोक येथें येऊन ब्राह्मणभोजन, गंगास्नान, पूजन वगैरे करितात. त्यामुळे यांस रोजची नवी प्राप्ति आहे. येथील सर्व