पान:महाबळेश्वर.djvu/64

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साचा:अलीग्न याच देवळांत आश्विन महिन्यांत नऊ दिवस शारदानवरात्राचाही उत्सव होतो. तेव्हांही सर्व व्यवस्था वरील उत्सवाप्रमाणेंच होते. परंतु सुमारे १०० रुपये खर्चास पुरतात. याप्रमाणें दरसाल १२०० रुपये खर्च होऊन बाकीचें उत्पन्न शिल्लक राहतें.

 याशिवाय येथें एक कमलजा नामक श्री देवीचें देऊळ आहे. याची अशी गोष्ट आहे कीं, या डोंगराचे पूर्वेच्या बाजूस जोर खोरें आहे त्यांतील वेदगंगा इचे तीरास घोर जंगलांत हिचें मूळपीठ आहे. तेथें कोळी वगैरे लोक जाऊन तिची फार उपासना करीत असत. हें पाहून हे कोळी लोक आपल्यास अनुकूळ होण्याकरितां येथें कोणी चंद्रराव मोरे म्हणून विजापूर बादशाहाचा सरदार छत्रपति शिवाजीचे पूर्वी येऊन राहिला होता, त्यानें या देवीचे स्थानास बरेंच महत्व आणिले. हा मोरे विजापूर बादशहाच्या पदरचा म्हणून म्हणावीत असे.परंतु तो त्याला भीक घालीत नव्हता. त्याचा वाडा जवळच जावली गांवांत होता तो वाडा शिवाजीनें, हा मोरे मराठा असून मोंगलाच्या ओंजळीनें पाणी पिणारा आहे असें पाहिल्यावर, पाडून जमीनदोस्त केला