पान:महाबळेश्वर.djvu/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २१ )

 आर्थरसीट म्हणुन फार प्रेक्षणीय जागा आहे तिचें वर्णन पुढे आलें आहे. ती पाहण्यास जाण्याचा रस्ता या ब्रह्मारण्यांतून गाडी जाणे सारखा केलेला आहे तरी तो रस्ता, जागा डोंगराळ असल्यामुळे फार चढउताराचा आहे. या ब्रह्मारण्यांतून मालकमपेठेकडे दृष्टि फेंकिली असतां लांबपर्यंत हिरव्या रंगानें मढविल्यासारखी जमीन दिसते.

---------------
महाबळेश्वरगांव.
---------------

या क्षेत्रांत ब्राह्मण, कुणबी, कोळी, धनगर, वगैरे लेकांचीं मिळून घरें सुमारें ५० आहेत, त्यांत नुसती ब्राह्मणांचीं घरे ३२ आहेत. या गांवांत ब्राह्मणांची वस्ती जशी ज्यास्त आहे, तशी दुस-या जवळपासच्या मैलांतील केाणत्याही खेडय़ांत सांपडणें कठीण. हे बहुतेक सर्व ब्राह्मण भिक्षुकीचा धंदा करून पोट भरणारे आहेत. भिक्षुकीशिवाय व्यापार किंवा उत्पन्न असणारे लोक सुमारें आठ किवा दहा असामीपेक्षां ज्यास्त नाहींत. बाकी राहिलेल्या कुटुंबांचा निर्वाह