पान:महाबळेश्वर.djvu/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २० )

 वर्षे झालीं असल्यामुळे पावसाच्या पाण्याच्या मोठमोठ्या लोंढयांबरोबर उंच प्रदेशांतील गाळ वाहत येऊन त्याचा यज्ञकुंडावर लेप (खपली) बसल्यासारखा झाल्याकारणानें यज्ञकुंडाचें भस्म वरील माती उकरून मग काढून पहावें लागतें व तें भस्माप्रमाणे पांढरे असून हातावर पाणी घेऊन चोळून पाहिलें असतां स्निग्ध आहे असें वाटतें. या ब्रह्मारण्यांत चतुष्पाद हिंसक श्वापदाप्रमाणेंच पोटानें चालणारे फार विषारी सर्प जिकडे तिकडे दृष्टीस पडतात. पूर्वी एकदां या ब्रह्मारण्यांतील वाळलेल्या गवतास वणवा लागला होता तेव्हां सर्पांचीं भेंडुळीं मरून पडलेलीं पुष्कळच पाहण्यांत आलीं होती. सकाळीं व सायंकाळीं या विषारी जिवांच्या बिळाबाहेर पडण्याच्या समयास अनवाणी फिरणें फार धोक्याचें आहे.

  या ब्रह्मारण्यांत एकटें दुकटें पाहण्याकरितां जाण्याचें फार कठीण काम आहे. मंडळीबरोबर जाण्यांत इतकी भीति वाटत नाहीं. साहेब लोक तर हातांत बंदुका घेतल्याशिवाय तिकडे फिरावयास जात नाहीत, या ब्रह्मारण्यांत अगदीं उत्तर बाजूस एक