पान:महाबळेश्वर.djvu/381

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३४६ )

 पांढरें रस्ते वगैरे सर्व देसुरी हवापाण्याचीं चिन्हें लागतात. हा गांव लहान वस्तीचा आहे. येथें शंकराचें देऊळ आहे. त्यांत पाण्याची उत्तम सोय आहे. येथें रस्त्यावर घोडयाचा टप्पा मेल कंट्राक्टर यांचा आहे. पांचगणीच्या मातींतही लोहांश मिश्रित आहे. परंतु जमिनीच्या आंगीं महाबळेश्वराप्रमाणें मोखरपणा नाहीं. पाण्याचा तळ लौकर लागतो व जमिनीत विहीर करण्यास खडकाचा धरही लागतों असें जरी आहे तरी हुकमी पाणी लागेलच असा भरंवसा नसतो. यामुळे गोडीला व गारपणाला जरी महाबळेश्वरच्या मासल्याचें पाणी येथें आहे, तरी तें मनमुराद मिळत नाही. येथें फक्त ३ सार्वजनिक झरे आहेत. बाकीचे लोकांच्या खाजगत जमिनींत सापडल्यामुळे त्यांबद्दल विशेष माहिती देण्याचें कारण नाहीं. या तिहींपैकीं बारा महिने भरपूर पाणी असणारा झरा उत्तरेस जरा खालीं उतरून गेलें ह्मणजे लागतो. त्याला कडें बांधून काढलें असून त्यांस मराठ्यांची विहीर असे ह्मणेतात. यास सरकारांने अलीकडे ३५३ रु. खर्च करून चांगले दुरूस्त केले आहे.