पान:महाबळेश्वर.djvu/382

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३४७ )


 पांचगणी हे हवा खाण्याचे ठिकाण या दृष्टीने पाहिले असतां चांगले आहे. हवामान वर्षभर सुखासमाधानाने राहण्यासारखे आहे. येथील हवा थंड असून पाचक आहे, परंतु थोडी रुक्ष आहे. येथेही फिरावयास जाण्यायेण्याच्या वाटा असून पाइंटासारख्या जागा केलेल्या आहेत. त्या सिडणी पाइंट व टेबलल्यांड ह्या होत. ही दोन ठिकाणे फिरण्यास जाण्यासारखी आहेत. अलीकडे गांवाच्या मागील अंगास डोंगरांचे शिखर आहे त्या लगतउंचावर मोठी दगडी ताल घालून खेळण्याची पैस जागा केली आहे. त्या ठिकाणी सायंकाळचे सुमारास लोक खेळण्याकरितां जमतात. ही स्टेशन फंडाने तयार केली आहे.

व्यवस्था.

 येथील लोकसंख्या सुमारे ७००।८०० आहे. त्यांत नेटिव ६०० असून साहेब लोक १००।१५० आहेत. येथील सर्व अधिकार सुपरिटेंडेंट साहेबाला आहेत. त्यांची योग्य बजावणी होऊन लोकांस नीट स्वच्छता ठेवण्याची दहशत असावी