पान:महाबळेश्वर.djvu/380

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३४५ )


त्यांच्या गळ्यांत सर्व व्यवस्था पाहण्याचें सर बार्टल फ्रियरसाहेब यांनीं घातलें. येथें राहणाऱ्या लोकांस महाबळेश्वरपेक्षां येवढीच कमतरता आहे कीं त्यांस बाहेर फिरून पाहण्यास रम्य ठिकाणें नाहींत. येथून पूर्वपश्चिम पसरलेल्या कृष्णाखोऱ्याची भव्य शोभा दिसते. किनाऱ्यावरून ठिकठिकाणींं गांवें आहेत त्यांतील घरांच्या व झोपडयांच्या लहान लहान समुच्चयांचे तुकडे तुकडे, भोंवतालच्या झाडीतून व पिकांतून ओसाड भगदाडे किंवा खांडवे पडल्यासारखीं दिसतात. नदीच्या पाण्याचीं वळणे हिरव्या गार पिकांतून कृष्णसर्प शांतपणानें पसरल्याप्रमाणें वाटतात. दक्षिण अंगास तर छोटेखानी पण याहीपेक्षां प्रेक्षणीय मजा दिसते.

 पांचगणीच्या जमिनीच्या अंतर्यामी उष्णता उत्पन्न करणारीं द्रव्यें आहेत. यामुळे डोंगरकांठच्या खडकाचे तळाशीं खोदलें असतां त्याठिकाणींं धुमसत असलेला अंतरंग वन्हि एकदम थंड होऊन बुडबुडे आल्यासारखे वाटतात. जवळ धांडेघर गांव आहे तेथें पाणी चांगलें असून तेथून काळे दगड,