पान:महाबळेश्वर.djvu/379

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३४४ )

 आंगच्या डोंगरांकडे पांगून गेल्यामुळे पांचगणीचा चांगला बचाव होतो. यामुळे पांचगणीला खुशाल बारा महिने राहिलें तरी नकोसें वाटत नाहीं. पूर्व बाजुनेंहीं डोंगराचें उच्च नाकाड आलें असल्यामुळे थंडीच्या दिवसांतील पूर्वाभिमुख वाराही महाबळेश्वराप्रमाणें येथें आंगाला झोंबल्यासारखा लागत नाहीं.

 पांचगणी येथील वसाहत होण्यास जान चेस साहेबांनी पहिल्यानें हिय्या करून परिश्रम केले त्यांचे चांगलें सार्थक झालें. या स्थानाची उंची ४३७८ फूट आहे. येथील जमीन व हवा मनुष्यांस व समशीतोष्ण कटिबंधांत होणाऱ्या फळझाडांस फार चांगली आहे असें यांनीं सन १८५४ सालापासून स्वानुभवाने खात्री करून घेऊन लोकांच्या प्रतीतीस आणिल्यावर सन १८६२ साल पावेतों साहेबलोकांची ६ घरें येथें झालीं आणि लागलींच याचवर्षी सरकारांतूनही मदत म्हणून सालींना २००० रूपयांची नेमणूक येथील स्वच्छतेच्या व्यवस्थेकरितां चालू झाली. जान चेससाहेबालाच पहिले आनररी सुपरिंटेंडेंट व माजिस्त्रेट करून