पान:महाबळेश्वर.djvu/376

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३४१ )

 वालों केलेलें असतें. हे पाद्री आक्टोबरपासून पावसाळा लागेपर्यंत येथें राहून पावसाळ्याला परत गोंव्यास जातात. त्यांला गोवें सरकारांतून नक्त वेतन मिळतें, खेरीज बापतिस्मा देणें, लग्नें लावणें, प्रेतसंस्कार करणें, आणि आवांतर कृत्यें हीं त्यांचीं येथील कर्तव्यें होत. याबद्दल जी फी येईल तिच्यावर यांची मालकी असते.

 मरेचें घर-मरेसाहेब हिंदुस्थान सोडून निघाले तेव्हां त्यानीं आपलें घर अमेरिकन मिशन पैकीं साध्वी ग्रेव्हाबाईसाहेब यांस इनाम दिलें होतें. त्यांनी आपल्या पतीप्रमाणेच या ठिकाणी आमरणांत दिवस काढले. तेव्हां त्यांच्या पश्चात हें देऊळ अमेरिकन मिशन मंडळींला चर्चाचे कामास आयतेंच सांपडलें. आणि यामुळे आतां या इलाख्यांतील कोणत्याही अमेरिकन मिशनरीला किंवा त्यांच्या कुटुंबाला हवा बदलणेचें प्रयोजन पडल्यास येथें बदल करून घेऊन चांगल्या आरोग्यकारक हवेत राहण्यास फार सोईकर झालें आहे. ह्या देवळांत रविवारी ११ वाजतां प्रसंगोपात इंग्रजीतून प्रार्थना