पान:महाबळेश्वर.djvu/375

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३४० )

 जूस आहे. १८४२ सार्लीं क्वार धर्मगुरूंनीं ही इमारत सार्वजनिक कामाकरितां म्हणून अर्पण केली होती ती नवी जुनी करून हल्लीं ईश्वरसेवोपयोगी केली आहे. तारक येशु, मोझेस, आणि महा साधु योहान्न वगैरे पवित्र मूर्तीची सुंदर चित्रे विलायतेतून तयार करून आणून उंच तक्ताजवळ बसविलीं आहेत. यांत निरनिराळ्या उपासकांचीं देवळांत २१० प्रार्थनासनें मांडलीं आहेत. हें मंदिर सातारच्या धर्माध्यक्षाच्या ताब्यांत दिलें असल्यामुळे उन्हाळ्यांत ते आपला डेरा येथें देऊन राहतात. लोकांस या मंदिरांत येऊन आसनारूढ होण्यास आतां कांहीं दक्षणा यावी लागत नाहीं. येथील फूटतूट दुरस्ती इंजिनियर खात्याकडून होत असते. आदित्यवारचा दिवस देवळांत साहेबलोक ईश्वरभजनांत घालवितात. सकाळीं आठ वाजतां दर्शन व सायंकाळीं ५-३० वाजतां प्रार्थना व धर्माचे विषयावर चर्चा अशा गोष्टी रविवारी होतात.

 संताक्रुज-बाजाराच्या पेठेत क्याथालिक धर्माचें एक देऊळ आहे, तें गोमांतकी पाद्री साहेबांच्याह-