Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/374

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३३९ )

 कडचें आहे. या देवळाची इमारत मजबूत असून आटोपशीर अशी बांधलेली आहे. याच्या सभामंडपाचें लांकूडकाम चांगलें केलें आहे. या देवळास एकंदर दोन अडीच हजार रुपये खर्च झाला तो गांवकरी लोकांनीं याचकवृत्ती करून केला आहे. या गांवकरी लोकांत कोणीं रामाचें उपासक व कोणीं गाणपत्य आहेत म्हणून यांत आणखी गणेश स्थापनाही झाली आहे. आतां गोकुळ अष्टमीला विठोबाचा, रामनवमीस रामाचा, हनुमानजयंतीस मारुतीचा असे उत्सव होत असतात. सर्वांत रामाचें देवळाची इमारत व देवांच्या मूर्ति पाहण्यासारख्या ‘ आहेत. हीं देवळे पेठेत आहेत.

 आजकाल श्रीरामाच्या देवळाची सर्व लोकांस फार भक्ति आहे. कांहीं भक्तिमान् लोक दररोज तेथें " रामकृष्णहरि " वगैरे नामघोष करून भजन करितात.

 ख्रिस्ति लोकांनींही येथे प्रार्थना करण्याची मंदिरें बांधिलीं आहेत. ज्यांस क्राइस्ट चर्च म्हणतात, तें विस्तीर्ण ख्रिस्तमंदिर बाजारच्या जरा उत्तर बा