पान:महाबळेश्वर.djvu/366

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३३१ )

 त्यांजवरून विदित होणार आहे. इकडील कोणत्याही प्रकारची माहिती आमचेकडे मिळेल.

लष्कर उतरण्याचीं ठिकाणें.

 चांगलीं पैस असून अगदीं सपाटीची व देखावे व पाणी संनिध असलेली अशी सर्वोत्कृष्ठ जागा येथें सासून पाइंटजवळ आहे. ही जागा सासून घराण्याच्या मालकीची असल्यानें त्या जमिनीवर तळ देणे असल्यास त्यांच्या वंशजांची परवानगी घेऊन मग छावणी द्यावी लागते. तीन लष्करी छावण्या यत्किंचितही संकोचीत्पणा न होता येथें खुशाल देतां येतात, इतकी ही विपुल जागा आहे.

 दुसरी जागा हिरडा डेपोजवळ आहे. ती सर्व जंगलखात्याच्या देखरेखीखालीं आहे. या ठिकाणीं पूर्वी सातारच्या राजाच्या सैन्याचा तळ पडून मोठा गांव वसल्यासारखे होऊन जात असे; म्हणजे लष्करकरितां बाजार वगैरे सोई अवश्य असल्यामुळें जवळपासच्या खेडगळे लोकांनीं या जागेला बाजार हेंच नांव दिलें होतें. परंतु पुढें मालकमपेठ बाजार बनल्यानंतर वर सांगितलेल्या बाजारास जुना बाजार