पान:महाबळेश्वर.djvu/365

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३३० )

 खालीं असलेले सर्व बंगले निरनिराळ्या जात्यभिमानी लोकांनीं आपल्या आपल्या जातिबंधुकडे सोंपवून दिल्यामुळे जो तो हौस एजंटच झाला आहे. व यापासून एकास मिळत असलेला कमिशनचा फायदा पुष्कळांत विभागला जाऊन या धंद्याची कवडीमोल किंमत झाली आहे. असा प्रकार झाल्यामुळे एका मनुष्यास पुष्कळ कामें पडून त्या सर्वांत त्यांचें लक्ष विभागले गेलें आहे. याचा परिणाम असा झाला कीं, बंगल्याच्या दुरस्तीकडे किंवा त्यांत आलेले भाडेकऱ्याच्या सोईगैरसोईकडे लक्ष्य कमी पोहोचून मालकाचें नुकसान व भाडेकऱ्याची गैरसोय होण्याचा संभव फार.

 आमचा स्वतांचाही हैोसएजंटचाच धंदा आज १५|१६ वर्षे चालला आहे. परंतु वर्षांतून आठ महिने आम्ही या धंद्यास काया-वाचा-मनें-करून झटून व यत्न करून लोकसेवा करीत आले आहों. त्यांत केवळ पैसा कमाविण्यावरच दृष्टी दिली नाहीं. आह्मी केलेल्या सेवेबद्दल सद्गृहस्थांनीं अभिप्राय दिले ते पुस्तकाचे अखेरीस जोडले आहेत;