Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/367

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३३२ )

 हें नांव पडलें, हल्लीं या जागीं बाजाराचीं दुकानें वगैरे नाहींत तरी येथील रहिवासी लोक यास जुना बाजार असेंच म्हणतात. येथील वेण्णा सरोवर बांधून काढून पाण्याचा सांठा केला आहे ते सातारच्या महाराजांनीं आपले लष्करकरितांच केला होता.

 तिसरी जागा व्हिक्टेरिया काटेज नांवाच्या बंगल्यालगत आहे. ती महाबळेश्वर म्युनिसिपालिटीची असल्यामुळे सुपरिंटेंडेंट साहेबांच्या ताब्यांत आहे.

 येथें तंबू ठोकण्याकरितां किंवा छपरें करण्याकरितां ज्या सार्वजनिक म्युनिसिपालिटीच्या जमीनी घेण्यांत येतात त्यांजबद्दलचें भाड़े म्युनिसिपालिटीत भरण्याची रुळी आहे. मग तें अर्धवट महिन्याचें असलें तरी भरपूर महिन्याचें भाडे घेतात. तें प्रत १ ली ५ रु; प्रत २ री ३ रु.; प्रत ३ री २ रुपये प्रमाणे असतें.

 धर्मसंबंधी सभा किवा वनभोजने करण्यास लागलेल्या जागेस भाडे ४४ रोजप्रमाणें द्यावें लागतें. मात्र या सर्व कमेटीच्या जाग्याबद्दल आगाऊ सुपरिंटेंडंट साहेबांची परवानगी घ्यावी लागते.

----------------------