अखेरपर्यत हें पहिलें प्रतीचेंच असतें. हें पहिलें प्रतीचें नसतें, त्या वेळीं सकाळचे ११ पासून सायंकाळचे चार वाजेपर्यंत तारा करण्याचें काम घेतात. आदित्यवार वगैरे सुटीच्या दिवशीं सकाळीं ७ पासून ९ पावेतों, आणि दुपारी ४ ते ६ पर्यंत आफिस खुलें असतें.
पाॅॅले माइटसाहेब सन १८४८ मध्यें येथें येऊन राहिला, आणि त्यानें हा हौसएजंटचा धंदा प्रथम घातला. त्यांत याला इतकी गोडी लागली होती कीं, त्यानें हें काम ह्मातारपणापर्यत सोडिलें नाहीं.
पुढे माइट साहेबांच्या गादीचें काम प्रॉन्क आर साहेबांनीं २०|२५ वर्षेपर्यंत चालवून आपलें बरेंच साधन करून घेतलें, व येथें ते आपलें कायमचें ठिकाण करून राहिले. यांस देवाज्ञा होऊन २|३ वर्षे झाली. यांचे मागें नांव घेण्यासारखा असा निव्वळ हौसएजंटचा धंदा करणारा कोणी नसल्यामुळे कोणाचेंही नांव येथें देतां येत नाहीं.
या ऑर साहेबांच्या पश्चात् त्यांच्या देखरेखी