पान:महाबळेश्वर.djvu/363

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३२८ )

 मनी आरडरी पाठविणें त्या गुरुवारीं पाठविणें हा उत्तम पक्ष. ह्मणजे डाक चुकण्याची व खोटी होण्याची धास्ती राहत नाहीँ. मेल कंत्राटदार मि. फ्रामजी आरदेसर यांनीं टपाल नेणें आणणेचें काम आज ३०|३५ वर्षे महाबळेश्वर सदर स्टेशनवर राहून फार चांगलें केलें आहे, व हल्लींही करीत आहेत. याकरितां यांचे मेलटांग्यांत बसून वाठाराहून येथें व येथून वाठारास येण्याजाण्यास पासेंजर लोकांनाही जागा मिळते ती निर्धास्तपणें स्वीकारावी. त्याबद्दल पासेंजराला निदान ५ रू० भाडे पडतें.

तार आफेिस.

सुपरिंटेंडंट साहेबांचें बिऱ्हाड वुडहौस नांवाच्या बंगल्यांत असतें, त्याच्याच पुढल्या अंगास सरकारी तार आफिस म्हणून पाटी लाविलेली आहे, तेथें हें आफिस आहे. दरसाल हें आक्टोबरला खुलें होऊन तारीख १५ माहे जूनला बंद होतें, थंडया ऋतूमध्यें येथें गव्हरनर साहेबांची स्वारी असते तोंपर्यंत पहिल्या प्रतीचें असल्यामुळे रात्रंदिवस उघडे राहून काम चालतें. व उन्हाळ्यांत तर