पान:महाबळेश्वर.djvu/362

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३२७ )

 जतां येतें, व रनरबरोवर वांईपर्यत जाणेसाठीं दुपारीं २ वाजतां रवाना होतें. या वेळीं कोणीही परगांवचा इसम येथें राहत नाहीं व गांवांतही ज्यांना पोटाच्या खळीसाठीं हें ठिकाण सोडतां येत नाहीं, अशी साहेब लोकांच्या नोकरांचाकरांची, श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानच्या ब्राम्हणांची, दहा पांच वाण्याउदम्यांची, एक दोन दारू विकणा-या पारशांची, व धावड, धनगर कुणबी वगैरे आणखी कांहीं लोकांची, मिळून सुमारें एक हजाराची येथली कायमची वस्ती असते. उन्हाळ्यांत ती पांचसात हजारापर्यंत होते. तेव्हां पावसाळ्यांत पोष्टाला उन्हाळ्याप्रमाणे काम नसल्यामुळे उन्हाळ्यांत पोष्टमास्तर एक व क्लार्क तीन असले तर पावसाळ्यांत एकच इसम राहून काम पाहतो.

 रविवार व सणाच्या सुटयाखेरीज करून बाकीच्या दिवसांत सीझनमध्यें रोजच्या देवघेवीची वेळ सकाळीं ७ पासून ८ पर्यंत व दुपारीं १२ पासून ३ वाजेपर्यंत असते. यूरोपांत जाणाच्या डांकेचीं पत्रे टाकणें तीं शुक्रवारीं टाकणे; व बंग्या,