पान:महाबळेश्वर.djvu/361

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३२६ )

 म्यान येथें येऊन लागलींच १० चे सुमारास पोस्टमन पत्र वगैरे जिकडचीं तिकडे वांटून जातो. कोंकण व महाड बाजूची डांक दुपारीं दोन वाजतां येते व त्याची डिलिव्हरी तेव्हांच करितात. जेव्हां नामदार गव्हरनर साहेब यांची स्वारी येथें असते तेव्हां दररोज दोनवेळां टपाल येऊन दोनवेळां पत्रवांटणी होते. साहेब लोकांचे नोकर टपाल घेण्याकरितां पोस्टांत येतात, त्यांना लगेच टपाल मिळतें. रात्रीं आठ वाजतां आलेल्या पत्रांची वांटणी सकाळीं बरोबर सहा वाजतां होते; व सकाळीं आठ वाजतां आलेलीं पत्र नऊ वाजतां वाटून शिपाई मोकळे होतात. टपाल जाण्याची नेहमींची वेळ सायंकाळीं बरोबर सहा वाजतां असते. तसेंच गव्हर्नर साहेबांचा येथें मुकाम असल्यास सकाळीं बरोबर सहाला येथून आणखी एक स्पेशल डांक वाठाराकडे जाते. महाडाकडे सकाळीं ११ वाजतां डाक बंद करून रवाना होते.

 पावसाळ्यांंत (जूनपासून सपटेंबरपर्यंत) वाठार कडील टपाल रनरकडून वांईपासून येथें ११ वा