पान:महाबळेश्वर.djvu/360

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.पोस्ट (आफेिस) व तार (आफिस)-------------------------

 पश्चिम दिशेस एकमेकाला लागूनच तार अफिस व पोस्ट ( टपाल ) आफिस हीं दोन आफिसें आहेत. बारा महिने येथें पोस्टाचें सर्व काम चालतें. पत्रे टाकण्याकरितां या शिवाय आणखी ३ खांब पुरलेले आहेत. पहिला खांब सातारा रस्त्यावर हीथ व्ह्यू नांवाचे बंगल्यापुढें आहे, दुसरा खांब भाजी मंडईनजिक दीक्षित यांचे घरापुढें आहे. तिसरा मुंबई पाइंटाकडे जाण्याच्या रस्त्यावर हिलस्टोन बंगल्याचे बाजूस आहे. याशिवाय महाबळेश्वराला जाण्याच्या वाटेवर मुल्लरचे बंगल्यानजिक एक पेटी लाविलेली आहे; तसेंच क्लब, रेसव्ह्यू हाटेल वगैरे प्रसिद्ध इमारतींतही एक एक पेटी लाविलेली असते.

 आक्टोबरच्या महिन्यापासून जून महिन्यापर्यंत वाठारकडील टपाल सकाळीं ८ आणि ९ चे दर-