हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३२४ )
स्थळ आहे. यामुळे येथें येऊन केव्हां तरी बसावें असें पुष्कळ लोकांस वाटतें व ते स्वस्थ बसलेलेही बरेच वेळां नजरेस येते. या उपवनांत ठिकठिकाणीं हौसी मंडळींना बसण्यास बाकेंही टाकिलेलीं आहेत. कुटुंबवत्सल मंडळींच्या मुलांचें येथें आल्यावर मनरंजन होण्याकरितां लोखंडी चार पाळणे व वर्तुळाकार फिरणारें घोडयाचें चक्र कायमचें ठेविलेले आहे. परंतु यांची मजा पाहण्याबद्दल दर एक कुटुंबवत्सल मनुष्यास म्युनिसिपाल कमिटींत थंड ऋतूबदल दीड रूपया व उष्ण ऋतू बद्दल दोन रुपये फी द्यावी लागते. ह्या बागेची व्यवस्था पाहण्याचें काम खुद्द सुपरिंटेंडंट साहेव व दुसरे कमिटीचे मेंबर लोक यांजकडे आहे. बागेची उत्तम प्रकारची स्थिति पाहून यांचें यावर चांगलें लक्ष्य आहे असें वाटते.
-------------------