पान:महाबळेश्वर.djvu/358

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३२३ )

 ळेश्वर येथें आरामासाठीं येणाऱ्या एतद्देशीय लोकांवर उपकार करून ठेविला आहे.

 या शिवाय येथे फ्रियरहालची लायब्ररी आहे तींत सभ्य नेटिव लोकांससुद्धां जाण्यास हरकत नसते. पूर्वी आनरेबल विश्वनाथ नारायण मंडलिक हायकोर्ट वकील यांनीं सार्वजनिक कामास मदत करण्याच्या आपल्या नैसर्गिक स्वभावाला अनुसरूनच या दोन्ही लायब्रऱ्यांचे उत्पादकपणाचें यश मिळविलें आहे. याप्रमाणें सार्वजनिक कामास यांनीं मुंबई इलाख्यांत फार मदत केली आहे.

रे गार्डन.

 नवीन बांधलेल्या बोमनजी पेटिट लायब्ररीच्या इमारतीला लागूनच निरनिराळ्या प्रकारच्या फुलझाडांनीं सुशोभित केलेला एक बगीच्या आहे त्यास “ रे गार्डन " असें ह्यणतात. यांत कुंड्यांतून, जमिनीवरील विलक्षण प्रकारच्या रेखून काढलेल्या आकृत्यांतून, व भोंवतालच्या किनाऱ्यावरून असलेल्या विलायती व एतद्देशीय अनेक रंगांच्या फुलापानांचा समूह पाहून चित्तास आनंद देणारें हें