Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/357

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३२२ )

 तारीख : २२ मे १९०२ इ. रोजीं मोठया समारंभानें झाला. त्यावेळीं गव्हर्नरसाहेबांचें नांव घालून हुद्द्याचे मोर्तब (Coat of arms ) कोरेलेली अशी एक मोठी रुपेरी चावी त्यांच्या स्वाधीन करून त्यांजकडून इमारत उघडविली. या समारंभाचे वेळीं परम उदार शेट बोमनजी पेटिट एकाएकीं आजारी पडल्यामुळे त्यांचे चिरंजीव सर जहानगीरजी पेटिट यांनीं आपल्या वडिलांचे आकस्मिक अस्वास्थ्यामुळे येणें अशक्य असल्याचें सांगून दुःख प्रदर्शित केलें आणि त्यांनीं नामदारसाहेबांस निमंत्रण करण्याचें काम आपल्यावर सोंपविलें आहे असा प्रस्ताव करून, गव्हरनरसाहेब आले त्याबद्दल आनंदाचे उद्रार काढले. शिवाय आणखी आभारदर्शक बरीच भाषणे झालीं.

 या संस्थेच्या उत्पादक कमिटीचे पुढारी सालिसिटर भाईशंकर नानाभाई, व श्रीयुत नारायण विश्वनाथ मंडलिक, बी. ए. वैगैरे मंडळींनीं फार खटपट करून ही लायब्ररी स्थापन करण्यांत यश संपादन करून महाब-