Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/356

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३२१ )

 दित करितात. त्यावर उत्तम प्रकारचें मुंबईहन आणलेलें लांकडी फरनिचर मांडलें आहे.

 या इमारतीचे पुढील अंगास टेनिस खेळण्याचे एक मोठे पटांगण ठेविलें आहे. या पटांगणांचे व मुख्य इमारतीचे सभोंवार लाल दगडाची पारापेट भित घालून त्यावर नकशीदार ओतीव लोखंडी रेलिंग बसविलें आहे. त्यांचें ओतकाम करितांना त्याच्या प्रत्येक तुकडयांत बोमनजी दिनशा पेटिट नांवाचीं आद्य अक्षरें (मोनोग्राम ) इंग्रजीत ओतवून घेतलेलीं आहेत. त्यांनीं करून ठेविलेलें हें रेलिंग ह्मणजे येथील आबालवृद्धांच्या मनांत बोमनजींच्या उपकाराबद्दलच्या कृतज्ञपणाची सतत जागति राहण्यासारखे रोज डोळ्यापुढें दिसण्याजोगें स्मारकच झालें आहे, असें ह्मटलें तरी चालेल, सभोंवार कुंडया वगैरे मांडून व फुलझाडें लावून बगीच्या बनविला आहे तोही फार शोभादायक झाला आहे.

 ही नवी लायब्ररी सुरू करण्याचा प्रवेशाविधी नामदार गव्हरनर लार्ड नार्थकोटसाहेब यांचेकडून