या इमारतीचें काम महाबळेश्वरच्या इतर प्रेक्षणीय इमारतीच्या तोडीचें झाल्यामुळे, हिनें या स्थलास जास्त शोभा येऊन ही फार लोकोपयोगी झाली आहे. हिची रचना ( design) अलीकडच्या पद्धतीची असून चांगली साधली आहे. हिचे बांधकाम मजबूत, टुमदार व शोभिवंत झालें आहे. ही इमारत सखल जागेमध्यें असल्यामुळे कंबरे इतकें उंच जोतें बांधून वर इमारत केली आहे. इमारतींत दोन अंगास दोन लहान दालने करून दरम्यान एक मोठा लांबलचक हाल केला आहे. यामुळे वर्गणीदारांस स्वस्थ बसून वाचण्यास फार पैस जागा झाली आहे. शिवाय कांहीं सार्वजनिक कारणानें सभा करणें इष्ट असल्यासही यानें मोठीं सोय झाली आहे. इमारतीच्या रूफास आंतून छताप्रमाणें जस्ती पत्रा मारलेला फार मजेदार दिसतो खरा परंतु आवाज झाले बरोबर लागलींच प्रतिध्वनी होऊन थोडा गोंगाट होतो. या इमारतीच्या आंतील व्हरांड्याच्या जमिनी मिंटन टाइलसच्या रंगीबेरंगी केलेल्या फार छान दिसून वरून चालणारास आनं-
पान:महाबळेश्वर.djvu/355
Appearance