रितां घेऊन येणारे लोकांस पेठेतून अगदीं उभे राहूं देत नाहींत. हे रात्रींस बरोबर भाले घेऊन रवणीस या पेठेच्या आसपास मात्र फिरत असतात. येथें रात्रींच्या प्रसंगीं कधीं कधीं जंगली हिंसक जनावरें दृष्टीस पडतात म्हणून ही भाल्याची कल्पना काढली आहे. येथील चावडीवर एक तास टांगलेला आहे, तोही पाहऱ्यावर असणारे शिपायाकडून वाजविण्यांत येतो. आणखी कोठें येथें आग किंवा रात्रीची मोठी चोरी वगैरे सार्वजनिक संकट आलें असतां हा तास एकसारखा घणघण असा बराच वेळ वाजवितात. तेणेंकरून गांवचे सर्व लोक संकट निवारणार्थ पोलिसच्या मदतीस एकदम गोळा होतात. सातार जिल्ह्याच पोलीस सुपरिंटेंडेंट हे पोलीस खात्याचे मुख्य आहेत.
मेढें तालुक्यांत या पेटयाचा समावेश होत असल्यामुळे मेढयाचा तालुका सबरजिष्टर मार्च, एप्रिल व मे या महिन्यांत पहिले सोमवारी येथें येऊन दस्त नोंदण्याचें काम करून जातो. तसेंच १०० रुपयाचे आंतील शेतक-यांचे दस्त नोंदण्या-