Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/350

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३१५ )

 लागतो. या तिजोरींत बँकेचे चेकचा पैसा मिळत नाहीं. कारण येथे ही तिजोरी बँकेचें काम करीत नाहीं.

 या इमारतीत याशिवाय पोलीस कामगाराचीं कचेरी असते. त्याचा मुख्य कामगार फौजदार किंवा चीफ कान्स्टेबल नेमलेला असतो. त्याचे हाताखालीं फार तर पोलीसशिपाई व नाईक मिळून २५|३० पर्यंत लोक असतात. त्यांवर जमादार वगैरे वरिष्ट लोक सीजनच्या वेळीं जास्त नेमितात. अलीकडे हिंदुस्थानांत प्लेगचा प्रादुर्भाव झाल्यापासून या महाबळेश्वर सानिटेरियमवर दूषित भागाकडून येणारे कमी दर्जाचे लोकांस आबझरव्हेशन कॅम्पमध्यें ठेविण्याची फार कडक व्यवस्था आहे. त्याकरितां प्लेग फौजदार व त्याचे सोईसाठीं लागणारे पोलीस कामगारही येथें सीजनभर ठेविलेले असतात. येथील पोलीस कान्स्टेबल दिवसा पेठेतील रस्त्यावर उभे राहून गाड्या घोडयांच्या तडाक्यांत कोणी सांपडू नये ह्मणून चांगली दक्षता ठेवीत असतात. गवताचे किंवा जळाऊ लाकडाचे भारे विक्री क-