पान:महाबळेश्वर.djvu/349

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३१४ )

 येतो. या करितां हे साहेबबहादूर आपल्या हेडक्लार्काची योजना करून त्यास प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा, व पुढें प्रत्येक मंगळवार, गुरुवार, आणि शनिवार या दिवशीं दुपारीं १ पासून ४ वाजेपर्यंत हें काम करण्यास पाठवितात. मध्यंतरी स्टांप तिकिटें वगैरे घेण्याची किंवा नोटी मोडण्याची आवश्यकता पडल्यास सुपरिंटेंडंटसाहेब यांजकडे लेखी अर्ज केल्यावर ते त्याकरितां तिजोरी उघडतात. या अडचणीमुळे येथें बाजारांत सामान घेण्याकरिंता येणारे साहेबलोकांच्या बटलरांस वगैरे नोटी मोडण्यास सराफ लोकांकडे बटणावळ देण्याचा हमेषा प्रसंग येतो. मुंबईसरकारच्याच नोटा मात्र या खजिन्यांत घेतात, इतर ठिकाणच्या घेत नाहींत. तसेच या फार फाटक्या, चिताड किंवा दोन वेगळाले तुकडे जोडून केलेल्या नोटा केव्हांही तिजेारीत घेत नाहींत. १०० रु. रकमेवरील किंमतीच्या नोटा मोडण्याचें असेल तेव्हां त्याबरोबर नोटांचे नंबर व त्या आणणारा मालक हें एका कागदांत दाखल करून तो कागद त्या नोटांलगत पाठवावा