काम करीत असतात. याशिवाय यास सुपरिंटेंडंट साहेबांसही येथील व्यवस्थेसंबंधानें मदत करण्यास झटावें लागतें. जिल्ह्याचे मुख्य मालक कलेक्टर साहेब हे या सुपरिंटेंडंटचेही वरिष्ट आहेत. कोणी संस्थानिक येथे येणार असल्यास किति लोकानिशीं येणार हे त्यास आगाऊ सुपरिंटेंडंटसाहेब यास कळवावें लागते.
या महालकऱ्याची कचेरी किंवा ज्यास चावडी असें ह्मणतात ती मालकमपेठेच्या ऐन मध्य वस्तींत बांधलेल्या एका सरकारी इमारतींत आहे. या इमारतींतच सरकारी तिजोरी असते. सीजनच्या दिवसांत येथें येणाऱ्या मोठमोठया अमलदारांच्या पगारवांटणीची खोटी होऊं नये म्हणून नेहमीं लाख रुपयेपर्यंत या तिजोरींत शिलकी राखावी लागते. त्यासंबंधी देवघेवीचे व्यवहार करण्याचें काम खुद्द सुपरिंटेंडंट साहेबांकडे आक्टोबर ते जूनपर्यंत असतें. पुढें पावसाळ्यापुरतें महालकऱ्याकडे येतें. हुजूर डे० कलेक्टर यांचेकडे या तिजोरीचे हिशोब तपासणी होऊन रकमेचा तोटा आल्यास जिल्ह्याचे खजिन्यांतून पैसा