पान:महाबळेश्वर.djvu/347

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३१२ )

पांचापूर्वी त्यांस सूचना देऊन ठेवावी लागते. त्यांची फी दिवसास रुपये १० व रात्रीस रुपये २० आहे. या संस्थेचा खर्च म्युनिसिपालिटीकडून होत असतो.

चावडी व फौजदार कचेरी.

 या हिल्लस्टेशनवर सर्व प्रकारची व्यवस्था पाहण्यास दर दोन वर्षांनीं एक गोरा मुख्य अमलदार सरकारांतून नेमण्यांत येतों, त्यास “ सुपरिंटेंडेंट " असा हुद्दा दिलेला असतो. हे येथें आक्टोबरच्या सुरवातीपासून तों जून १५ पावेतों राहून चोहींकडे देखरेख करीत असतात. हे नेहमीं सिव्हिल सर्जनच्या परीक्षेत पसार झालेले असले पाहिजेत असा नियम आहें. यांस येण्याबरोबर दुसरावर्ग माजिस्त्रेटचा अधिकार मिळतो; व पुढे यांस केव्हां केव्हां पहिला वर्ग माजिस्त्रेटचाही अधिकार देतात. या माजिस्त्रेटखेरीज येथें एक दुसरा अमलदार तिसरा वर्ग माजिस्त्रेटचा अधिकार असलेला बारा महिने राहतो त्यास " महालकरी " असा हुद्दा असतो. याजकडे मुलकी व माजिस्त्रेटी काम चालतें. हे मेढें तालुक्याचे मामलेदाराच्या हाताखालील ठाणेदार या नात्यानें