हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३११ )
दवाखाना उघडा ठेवून औषधपाणी देण्याकरितां हजर असतात॰
सर्व सरकारी नोकरांना व लष्करी खात्याच्या नोकरांच्या कुटुंबांतील माणसांना कांहीं सल्लामसलत किंवा औषध घेण्यास कांहीं एक छदाम द्यावा लागत नाहीं. सरकारी नोकर नसून इनकम-टैंक्स भरणारें लोकांस दवाखान्यात येऊन प्रकृती दाखविण्याबद्दल आठ आणे व औषध घेण्याबद्दल तीन आणे मिळून आकरा आणे द्यावे लागतात. पुन्हा त्यांस दुसरे दिवशीं प्रकृति पाहण्यास चार आणे व औषधाबद्दल तीन आणे आकार पडतो. हॉस्पिटल असिस्टंंटला दिवसा घरीं आणण्याचें कारण पडल्यास फी एक रुपया देऊन औषधाचे तीन आणे भरावे लागतात. रात्रीं आणण्याबद्दल औषधाशिवाय दोन रूपये फी पडते.
कोणास सिव्हिल सर्जनची सकाळीं अवश्यकता आहे असें वाटल्यास त्यानें त्यांस सकाळीं नऊ वाजण्याचें आंत चिठी पाठविली पाहिजे किंवा रात्रींची बोलाविण्याचीं जरूर वाटल्यास सायंकाळचे