पान:महाबळेश्वर.djvu/345

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३१० )

 व उन्हाळ्यांत येथें बाहेरील लोक येऊं लागले ह्मणजे सुमारें २०० पर्यंत वाढते. या या मुलांपैकीं बहुतेक मुलें मराठे व मुसलमान जातींचीं असतात. शाळेत शिक्षक पांच आहेत. एक हेडमास्तर असून त्यांचे हाताखाली आणखी चार असिस्टंट मास्तर असतात. ही शाळा येथील म्युनिसिपल कमिटीच्या ताब्यांत असून तिच्या संबंधाच्या सर्व प्रकारच्या खर्चाची व्यवस्था म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नांतूनच होतें.

हॉस्पिटल.

 फ्रियर हालच्या नजिक म्युनिसिपालिटीच्या आश्रयानें चालणारी स्टेशन हॉस्पिटल आणि धर्मार्थ दवाखान्याची संस्था आहे. तीवर येथील सुपरिंटेंडंटसाहेबांची तपासणी असते. येथें या साहेबबहादुरांचें हुकुमाप्रमाणें दवाखान्याचें काम करण्याकरितां एक हॉस्पिटल आसिस्टंट व एक कन्पौंंडर असे नोकर ठेविलेले असतात. ते दररोज सकाळीं ७ पासून १० पर्यंत व दुपारीं ५ पासून ७ पर्यंत