पान:महाबळेश्वर.djvu/342

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०७ )

 महा २ रु० व १६ वर्षांवरील वयाच्या त्याच्या कुटुंबांतील प्रत्येक इसमास दरमहा १ रु० प्रमाणें भंग्यास पैसा दिला पाहिजे. १६ वर्षांच्या आंतील वयाच्या मुलांस भंगीपट्टी माफ आहे. आपले हिंदु नोकरांना दरमहा माणशीं चार आणे पडतात. एकंदरींत बंगल्यामागें ६ रुपयांपेक्षां जास्त मुशाहिरा मात्र भंग्याला देण्याचा नाहीं.

 बंगल्याच्या मालकानें कंपौंडाची बाडी ( सुक्या दगडाचा गडगडा) व पिलर चांगले दुरस्त राखले पाहिजेत; आणि पावसाळा खलास होतांच पावसाच्या निवारणार्थ केलेल्या झडया किंवा तत्संबंधी कांहीं गदळा असेल ते काढून सर्व जागीं स्वच्छता ठेविली पाहिजे.

 कपौंडांत गवती छपराचे पायाखाने, तबेले किंवा झोंपडया तूर्तातुर्तीकरितां बांधण्याचें अवश्य पडल्यास त्याबद्दल सुपरिंटेंडंट साहेबांकडून आगाऊ परवानगी मागितली पाहिजे.

 कानसरव्हन्सीटॅक्स शेकडा १॥ प्रमाणें (अ) तारिख १ मार्च पासून तारीख १५ माहे जून