पान:महाबळेश्वर.djvu/341

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०६ )

 हवा न बिघडू देण्याचे कामीं फार त्रास पडू लागल्यामुळे आणखी या लोकांस अशी मुद्दाम सूचना देण्यांत येते कीं यांनीं आपले कंपॅौंडांत नोकर लोकांचे पायखाने तात्काळ तयार करून घ्यावे आणि त्यांतील मैला भंगीलोक लांब नेऊन डिपोंत टाकितात किंवा कोठं तरी जंगलांत फेकून देतात यावर त्यांनीं करडी नजर ठेवावी अशी त्यांस विनंती आहे. कारण, त्यांच्या कामावर दुर्लक्ष्य केले तर हे भंगीलोक जवळच्या झाडीत मैला टाकून हात हालवीत जाण्यास कधीं कमी करणार नाहींत. मागून मग तो कोणी टाकला व केव्हां टाकला ही चांभारचौकशी करण्यांत कांहींच उपयोग होत नाहीं॰ मैला टाकण्याची जागा कोणीकडे केली आहे ती समजून घेण्याकरितां आपल्या बरोबरच्या भंग्याला येथील कॉनसरव्हन्सी इनस्पेक्टरकडे पाठवून द्यावें. भंग्याची कामगीरीं बरोबर न झाल्याचें सुपरिंटेडटसाहबाच्या कानावर आलें, तर त्याबद्दल सक्त तजवीज केली जाईल.

 भंग्याचे दर-बंगल्यांतील मुख्य मालकास दर.