पान:महाबळेश्वर.djvu/343

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०८ )

 तागाइतचे ऊष्ण काळाबद्दल बंगल्याच्या या किंमतीवर असतो- व (ब) तारीख : १० आक्टोबर पासून २८ फेब्रुवारीपर्यंतच्या थंड काळाबद्दल म्युनिसिपालिटीच्या हद्दींतील खासगी ज्ञागेत कोठेहीं जनावरांकरितां किंवा गाडया वगैरेकरितां छपरें किंवा आडोशाची जागा हीं केल्यास त्यावद्दल दरएक सीजनला १०० चौ० फुटास दोन आणे प्रमाणे कर भरला पाहिजे.

 कानसरव्हन्सीटॅक्स ज्या इमारतीस द्यावा लागत असेल त्या इमारतीचे कंपौंडांत तंबु लावला असेल किंवा झोंपडी केली असेल तर त्यांजबद्दल मात्र इतर ठिकाणीं लावलेल्या तंबूच्या किंवा केलेल्या झोंपडयांच्या कराचा तिसरा हिस्सा कर दिला ह्मणजे झालें. पुढील इमारतीस कराची आकारणी होत नाहीं :- ज्या घराचे किंवा इमारतीचें वर्षास १५ रुपयांच्या आंत भाडे येतें त्या. ज्या म्युनिसिपालीटीच्या इमारतीस भाडें घेण्यांत येत नाहीं त्या आणि धर्मखात्यानें बांधून ठेवलेल्या धर्मार्थ इमारतीं