पान:महाबळेश्वर.djvu/340

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०५ )

 म्युनिसिपालिटीकडूनच होत असतें. तसेंच उन्हाळ्यांत येथील सडकांच्या बाजूस असणारे झाडांचा वाळलेला पाला पडून रस्ते कोठे अव्यवस्थित दिसल्यास ते झाडून साफ करण्याकरितां जागजागीं हातांत डाहाळ्याची झाडणी घेऊन बायकामाणसाची फरेट चोहोंकडे लागून गेलेली असते. यामुळे येथें केव्हांही व कोठेंही गलिच्छपणा दृष्टीस पडत नाहीं. अशी उत्तम प्रकारची म्युनिासिपालिटीची व्यवस्था असते, ती पाहून फार आनंद होतो.

कानसरव्हन्सी टॅॅक्स.

 येथें येऊन बंगल्यांतून राहणारे थोर लोकांनीं त्या बंगल्याच्या कंपौंडांत कागदाचे कपटयांचा आणि इतर हरतऱ्हेचा कचरा पडून गलिच्छपणा न दिसेल अशी तजवीज मेहरबानी करून ठेवावी; तो झाल्यास आपले नोकरांकडून एका जागीं गोळा करवावा ह्मणजे म्युनिसिपाल कमिटीच्या कचऱ्याच्या गाडयांतून भरून टाकण्यास फार सोईचें पडतें. बंगल्याच्या सभोवारचें जंगल स्वच्छ ठेवून