पान:महाबळेश्वर.djvu/339

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०४ )

 सुपरिंटेंडंटचे आफिसांत किंवा फौजदार कचेरींत अडकावून टाकून असले गुन्हे न होऊं देणेंबद्दल दक्षता ठेवील. त्यास हे अल्पवयी जीव रक्षण केल्याचें श्रेय मिळेल.

 येथील म्युनिसिपालिटीचा मुख्य अंमलदार सातारा जिल्ह्याचा कलेक्टर आहे. परंतु तो नेहमीं साताऱ्यासच राहत असल्यामुळे बहुतेक सर्व अधिकार येथील सुपरिंटेंडंटाकडेच सोपविलेले असतात. येथील वस्ती फार लहान असल्यामुळे मेंबरांची निवडणूक सरकार तर्फेच होत असते. या मेंबरांपैकीं कांहीं मेंबरलोक सरकारी नौकर असतात, व कांहीं गांवचे मोठमोठे ठळक व्यापारी असतात. या म्युनिसिपालिटीचें सर्व आफिस पावसाळ्यांत साताऱ्यास जातें. या हिल्लस्टेशनावर फिरण्यासारखे गाडीरस्ते सुमारें ६४ मैलपर्यत भरण्याजोगें चोहोंकडे पसरले आहेत. हे तयार करण्यास पूर्वी येथें असलेले चिनीबंदिवान लावून करून घेतलेले आहेत. याच कामावर त्यांस नेहमीं राबवून घेत असत. हलीं हे सर्व रस्ते पावसाळ्यांत खडी घालून दुरस्त ठेविण्याचे काम