पान:महाबळेश्वर.djvu/338

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०३ )

 मुदती आहेत. त्यांत मात्र या सूचनेप्रमाणें व्यवस्था राहणेची आहे. त्या मुदती-पक्षी मारणेची बंदी तारीख १ माहे मार्चपासून तारीख १ माहे आक्टोबर पावेतों; सांबर मारणेची बंदी तारीख ३१ माहे मेपासून तारिख १ नोवेंबर पावेतों; भेकर मारण्याची बंदी तारीख ३१ माहे डिसेंबरपासून तारीख १ माहे मार्च पावेतों; हरीण मारण्याची बंदी तारीख ३० माहे एप्रिलपासून तारिख १ माहे डिसेंबरपावेतों; ससे मारण्याची बंदी तारिख ३० माहे सपटेंबरपासून तारिख १ माहे मार्च पावेतों. या निर्दिष्ट केलेल्या मुदतींत ज्या कोणाजवळ नुकतेंच मारलेलें किंवा धरलेलें तें तें जंगली पांखरू किंवा ते तो प्राणी असल्याचें दिसून येईल, किंवा जो कोणी म्युनिसिपालिटीच्या हद्दींत त्या त्या जंगली पांखरांचा किंवा प्राण्यांचा पिसारा अगर कातडी काढून घेऊन येईल तो, ही पहिलीच वेळ असल्यास, १० रू० दंडास पात्र होईल. या परस्थलोकांकडे जी कोणी अशीं पांखरें किंवा प्राणी विक्रीकरितां घेऊन आलेला आढळेल यास