पान:महाबळेश्वर.djvu/337

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०२ )

 तरी त्यांस वर्षांचा कर भरणें भाग पडतें. गाडया घोडयांचें रजिस्टर ठेऊन त्यावरून कराची आकारणी करितात. गाडी किंवा घोडा स्वतःचा किंवा भाडयानें आणलेला असो, ती वापरणारांसच त्याबद्दल कर द्यावा लागतो, त्याचे प्रमाण:-

दरमाह. दरसाल
चारचाकी गाडी•••••••••• १२
दोनचाकी••••••••••
सारवट गाडी••••••••••
रबरी धावास ( जास्त ) १ ••••••••••
बसण्याचे - घोडे••••••••••
बसण्याचे तट्टास•••••••••• १॥

 हा कर लष्करी खात्याच्या व मुंबई सरकारच्या तैनातीस असणारे नोकरांस पडत नाहीं.

जंगली पक्षांस त्यांच्या वाढीच्या दिवसांत मारणारे लोकांस मारूं न देण्याबद्दल नजर ठेवण्याविषयीं येथें येणाऱ्या सर्व गृहस्थांस म्युनिसिपालिटीची सूचना आहे. कारण यासंबंधाचा कायदा महाबळेश्वरासही लागू केला आहे. तथापि त्यांच्या कांहीं