पान:महाबळेश्वर.djvu/336

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०१ )

 ज्यास्त पडण्याचीं जीं कारणे बंगले या प्रकरणांत दिलीं आहेत, तीं वाचतांना लक्षांत ठेविल्या पाहिजेत.

 ही म्युनिसिपालिटी निघाल्यावर निरनिराळ्या बाबीच्या उत्पन्नाची भर पडून आतां दरसाल म्युनिसिपल तिजोरींत सुमारें २०,४०० रुपये रकमेची जमा होत आहे. त्यांतून सुमारें १७,५०० रुपयांची रकम खर्ची पडून बाकीची दरसाल शिलक राहत आहे. या बाबी -फारेस्टकडे गेलेल्या म्युनिसिपालिटीच्पा जमिनींचे उत्पन्न; म्युनिसिपालिटीच्या बंगल्यांचें उत्पन्न; हौसटॅक्स, कान्सरव्हन्सी टॅक्स, व्हील व हॉर्स टॅक्स वैगरेचें उत्पन्न फार लौकर पैसा जमविण्यास कारण झाल्या आहेत.

 या हिलस्टेशनवर कायमचे रहिवाशी व हवापाण्याच्या सुखाची प्राप्ति करून घेण्याकरितां आलेली मंडळी यांजकडून पुढे दिल्याप्रमाणें गाडी व घोडयाबद्दल कर वसूल करून घेण्यांत येतात. येथें येणारे लोक एक पुरा महिनासुद्धां येथें राहणारे नसले तरी त्यांस महिन्याचाच कर द्यावा लागतो. सीझनचे केवळ तीन महिने जरी त्यांनीं येथें काढले