Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/335

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०० )

 पना केली. इ° स० १८८६ मध्ये या गांवम्युनिसिपालिटीच्या ताब्यांत या हिल्लस्टेशनकरितां घेतलेली सर्व जमीन देण्यांत आली. इतकें झालें तरी म्युनिसिपालिटीस सरकारी मदत म्हणून जी रकम मिळत होती; ती होतीच आणि अद्यापिही ५२१६ रुपये दरसाल मिळत आहेत. परंतु सरकारानें प्रथम बंगल्याकरितां घेतलेल्या जागेबद्दल एका एकरास एक रुपयापासून १० रुपये पावेतों प्रमाणें कर घेण्याची शिस्त ठेविलीच आहे. या जागेबद्दल सरकारानें कित्येकांस २१, ५०, व ९९ वर्षांचीं लीजें (कौल) दिले आहेत. सन १८८८ पासून पुढें ज्याचे जुनें लीज संपून गेलेमुळे त्यास नवीन करून देण्याची पाळी येईल, त्यानीं सरसकट एकरी १० रुपये प्रमाण कर सरकारास देण्याचे ठरविलें आहे. या शिवाय प्रत्येक बंगल्याच्या किंवा घराच्या मालकास वार्षिक भाडयाच्या मगदुरावर शेकडा २|| रुपयेप्रमाणें म्युनिसिपालिटीस घरपट्टी द्यावी लागत आहे ती निराळीच, याही गोष्टी बंगल्यास किंवा घरास भाडे